देवधे शाळा नं. १ व ४, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांचा सहभाग
लांजा (प्रतिनिधी): तालुक्यातील देवधे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ तसेच ४ चे विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने नुकताच वनराई बंधारा बांधण्यात आला.
यावर्षी कमी प्रमाणात पडलेला पाऊस आणि त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन आणि प्रशासनाने दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत देवरे शाळा क्रमांक १, शाळा क्रमांक ४ चे विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांच्यावतीने देवधे गावामध्ये ओझर पर्या येथे वनराई बंधारा बांधण्यात आला.
यावेळी शाळा नंबर १ चे मुख्याध्यापक सुभाष पराडकर , शाळा नंबर ४ चे मुख्याध्यापक श्री. आयरे, श्रीम. देसाई, विराज हरमले, शाळा नंबर ४ चे व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजय गुरव, दशरथ गुरव, प्रवीण गोंधळी, मंगेश गुरव, शाळा नंबर १व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीम. खामकर ,प्रकाश हरमले, सचिन हरमले, प्रदीप पडावे तसेच मोठया संख्येने पालक उपस्थित होते.














