मसुरे | झुंजार पेडणेकर : कांदळगाव काजरटवाडी येथे श्रमदानातून दोन वनराई बंधारे बांधण्यात आले. पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवणे आणि उन्हाळ्यात ग्रामस्थांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी श्रमदानातून वनराई बंधारे बांधणे ही काळाची गरज आहे. गावातील ग्रामस्थांनी, ग्रामपंचायत सदस्यांनी आणि सर्व शासकीय यंत्रणेने दाखवलेला हा एकजुटीचा व उत्साहाचा दृष्टिकोन अत्यंत अभिमानास्पद आहे. अशा लोकसहभागातूनच गाव स्वयंपूर्ण आणि जलसमृद्ध होऊ शकते असा विश्वास कांदळगावचे सरपंच श्री. रणजीत परब यांनी याप्रसंगी व्यक्त केला. यावेळी पंचायत समिती सदस्य श्रीम. योजना कांबळी, सरपंच श्री. रणजीत परब, उपसरपंच श्री. राजेंद्र कदम,ग्रामपंचायत अधिकारी श्रीम. पिंगुळकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीम. शारदा मुळये, माजी ग्रा. स. श्री. मनोज आचरेकर, माजी उपसरपंच श्री. कृष्णा राणे, पोलिस पाटील श्रीम. शीतल परब, , ग्राम महसूल अधिकारी श्री. बी. एस. शिंदे, कृषिसेवक श्री. विवेक रंगे, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. गजानन सुर्वे, पशुसंवर्धन पर्यवेक्षक श्री. महेश परुळेकर, सिआरपी श्रीम. विभावरी मेस्त्री, भरारी महिला ग्रामसंघ लिपिक श्रीम. वैष्णवी राणे, अंगणवाडी सेविका श्रीम. दीपिका बागवे आणि श्रीम. अपर्णा पाटकर,आरोग्य कर्मचारी श्री माजिक, अंगणवाडी मदतनीस श्रीम. अनुराधा सुर्वे आणि श्रीम. अक्षता आचरेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.













