सातार्डा : प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा कार्यालय ओरोस यानी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा ओरोस येथे घेण्यात आली. या स्पर्धेत सातार्डा हायस्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी यश मिळवले. १४ वर्षाखालील मुले ६८ किलो वजनी गटात युवराज उदय आसोलकर याने प्रथम क्रमांक मिळविला. तसेच १७ वर्षाखालील मुले ८० किलो गटात निषाद प्रकाश मांडवे यानेही प्रथम क्रमांक मिळवला. या दोन्ही विद्यार्थ्यांची कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षक तथा प्रशालेचे मुख्याध्यापक प्रशांत सावंत यांचे सातार्डा मध्यवर्ती संघ मुंबई पदाधिकारी, शाळा समिती पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.
———













