चिपळूण (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत, विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या खो-खो (मुले व मुली) तसेच व्हॉलीबॉल (मुली) संघाने तृतीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या नावावर यशाची मोहोर उमटवली आहे.
कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेअंतर्गत संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी या क्रीडा महोत्सवात सहभागी झाले होते. दापोली येथील विद्यापीठाच्या मैदानावर १२ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध क्रीडा प्रकारांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या अटीतटीच्या सामन्यांमध्ये मांडकी-पालवनच्या विद्यार्थ्यांनी जिद्द आणि कौशल्याच्या बळावर हे घवघवीत यश संपादन केले. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी ,क्रीडा अधिकारी प्रा. ज्ञानोबा बोकडे तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.












