बाल जलतरणपटू वेदा सरफरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांचा लांजा येथे गौरव

कै. एकनाथ राणे इंग्लिश मीडियम व ज्ञानेश्वर विद्यामंदिर लांजा यांच्या वतीने आयोजन

लांजा – संतोष कोत्रे : सरस्वती पूजनाचे औचित्य साधून लांजा येथील कै. एकनाथ राणे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्ञानेश्वर विद्यामंदिर लांजा यांच्या वतीने रत्नागिरी येथील बाल जलतरणपटू वेदा सरफरे तसेच लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांचा यथोचित असा सन्मान करण्यात आला.


कै. एकनाथ राणे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्ञानेश्वर विद्यामंदिर लांजा यांच्या वतीने आज शनिवारी प्रशालेमध्ये सरस्वती भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने वयाच्या केवळ १ वर्ष आणि ९ महिन्यांत २५ मीटरच्या तलावाच्या चार फेऱ्या मारत १०० मीटर अंतर १० मिनिटे ८ सेकंदात पूर्ण केले करून विक्रम करणाऱ्या तसेच या उल्लेखनीय कामगिरीबद्दल इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स , आशिया बुक ऑफ दी रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवले गेलेल्या रत्नागिरी येथील बाल जलतरणपटू वेदा सरफरे तिचा खास सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रपती पोलीस पदकाराने सन्मानित करण्यात आलेल्या लांजा च उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांचाही प्रशाली तर्फे विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमानिमित्ताने मिशन अभय अंतर्गत
मार्गदर्शन करण्यासाठी लांजा येथील वकील संपदा मुळे या उपस्थित होत्या. त्यांनी पॉक्सो अंतर्गत कायद्याबाबत उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यावेळी बाल जलतरणपटू वेदा सरफरे तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी चढाओढ लावण्याचे दिसून आले.
या कार्यक्रमाप्रसंगी काही एकनाथ राणे इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनुराधा राणे, संचालक कौस्तुभ राणे, ज्ञानेश्वर विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका प्रिया भागवत आदींसह प्रशालेचे सर्व शिक्षक वर्ग कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.