रत्नागिरी :
आरे-वारे येथील स्थानिकांच्या स्टॉलवर करण्यात आलेली कारवाईबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी संताप व्यक्त करतानाच, आपल्या मतदार संघात आपल्याला माहिती दिल्याशिवाय यापुढे कारवाई करु नये अशी सक्त ताकीद देत अधिकार्यांची खरडपट्टी काढली. वनविभागाच्या संबंधित अधिकार्याला निलंबित करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या वनाधिकारी गिरीजा देसाई यांना फोनवरुन दिल्या.
रत्नागिरीतील सागरी महामार्गावरील आरेवारे समुद्रकिनारी रस्त्याच्या दुतर्फा असणार्या स्थानिकांच्या स्टॉलवर दोन दिवसापूवर्ी वनविभागाने कोणतीही कल्पना न देता अचानक जेसीबी घेऊन बुलडोझर कारवाई केली. नव्यांसोबतच जुने स्टॉलही पाडले गेल्याने अनेक कुटुंबांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शनिवारी यातील काही स्टॉलधारकांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेत, हा प्रकार कानावर घातला. वनविभागाच्या कर्मचार्यांकडून होणारी अरेरावी याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर पालकमंत्री सामंत यांनी फोनवरुन वनविभागाच्या अधिकार्यांना चांगल्या शब्दात सुनावले व खरडपट्टी काढली. संबंधित कर्मचार्याला निलंबित करावे अशा सूचना दिल्या. आपल्या मतदार संघात यापुढे आपल्या कानावर घातल्याशिवाय कोणतीही कारवाई होऊ नये असेही ना. सामंत यांनी सुनावले.
कोकणातील पर्यटनाला मोठी चालना देण्यासाठी ‘सिंधुरत्न योजने’च्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रमुख समुद्रकिनाऱ्यांचा कायापालट केला जाणार आहे. आरेवारेसह भाट्ये, नेवरे ते थेट गणपतीपुळ्यापर्यंतच्या प्रत्येक बीचवर ५ ते ७ कोटी रुपयांचे आकर्षक प्रकल्प उभारले जातील. येथे स्थानिक व्यावसायिकांचा उदरनिर्वाह लक्षात घेऊन योग्य घटकांची पारदर्शक यादी तयार केली जाईल. पर्यटकांसाठी अत्याधुनिक वॉशरुम्स, स्वच्छ परिसर आणि स्थानिकांसाठी सुटसुटीत विक्री स्टॉल्सची उत्तम व्यवस्था उभारली जाणार आहे.
किनाऱ्यांवर होणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाने अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. प्रांताधिकाऱ्यांना याबाबत पूर्ण अधिकार देण्यात आले असून, विनापरवाना अनधिकृत स्टॉल उभे राहिल्यास किंवा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ते पाडण्याची वेळ आल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्याचे कठोर आदेश देण्यात आले आहेत. यामुळे पर्यटनाला शिस्त मिळण्यासोबतच स्थानिकांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
Home महत्वाच्या बातम्या आरे-वारे येथील स्थानिकांच्या स्टॉलवरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या संबंधित अधिकार्याला निलंबित करण्याच्या पालकमंत्र्यांच्या...













