कासार कोळवण येथे भाजपच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात

गौरव पोंक्षे माखजन
संगमेश्वर तालुक्यातील कासार कोळवण येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात राबविण्यात आले. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामस्थ, ग्रामपंचायत व प्रशासनातील कर्मचाऱ्यांसह आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांना शैक्षणिक साहित्याची मदत व्हावी तसेच समाजासाठी निष्ठेने कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेतली जावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ. रुपाली कदम, ओबीसी सेलचे संयोजक तथा संगमेश्वर दक्षिण तालुकाध्यक्ष श्री. धोंडू करंबेळे, युवा मोर्चाचे संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष श्री. अक्षय शिंदे, भाजप कासार कोळवणचे बूथ प्रमुख श्री. संजय माईन, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते श्री. अनंत जाधव आणि पंचायत समिती सदस्य श्री. मंगेश बांडागळे उपस्थित होते.
या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक प्रोत्साहन, ग्रामस्थांचा सहभाग आणि कर्तृत्वाचा सन्मान यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.