राजापूर हायस्कुल मध्ये संस्कृत दिन विविध उपक्रमांनी साजरा

संस्कृत भाषेतून विद्यार्थ्यांनी सादर केले कार्यक्रम

राजापूर (वार्ताहर): येथील राजापूर हायस्कूल प्रशालेत संस्कृत दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी संस्कृत मधुनच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

प्रशालेच्या कलामंदिर सभागृहात आयोजित या कार्यक्रम प्रसंगी राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह प्रकाश भावे, कार्यकारी मंडळाचे कार्यवाह जगदीश पवार, प्रशालेचे मुख्याध्यापक जगदीश भालशंकर, उपमुख्याध्यापक अरुण पोवार, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष राजेंद्र जोगळे, पर्यवेशक मधुकर तोडकर,कार्यक्रमाच्या आयोजिका व संस्कृत शिक्षिका सौ.शोभा जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी मांन्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व विद्येची देवता श्री सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले. तसेच संस्कृतमध्ये ईश्वस्तवन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

संस्कृत दिना निमित्त स्तोत्र, अन्त्याक्षरी, प्रदेशिका, संगीत शारध नाटक, विनोदकणिका, गीतम् कथ्थक नृत्य आदी कार्यक्रम संस्कृत भाषेतून सादर करण्यात आले. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी भगवत गीतेतील बारावा अध्यायाचे पठण केले. यावेळी दैनंदिन जीवनातील वस्तु व त्यांचे संस्कृत नाव यांची माहीती असेलेली पुस्तिका विदयार्थ्यांना देण्यात आलीसंस्कृत दिनाचे औचित्य साधुन हायस्कुलच्या कलामंदिर सभागृहामध्ये संस्कृत ग्रंथांचे व चांद्रयान प्रतिकृतिचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. तर यावेळी गतवर्षी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय गीतामाता व संस्कृत परिक्षां मध्ये ९४ पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या ४७ विद्यार्थ्यांना मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संस्कृत परिक्षेमध्ये हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याने संस्कृत परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या शाळांमध्ये राजापूर हायस्कुलला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपास्थित’ होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शोभा जाधव व आभार सौ. आरती सप्रे यांनी मानले.