मुद्रा बंध योगवर्गाने गणपती समोर सादर केलेल्या सांगीतीक योग प्रात्यक्षिके ठरली लक्षवेधी 

आचरा-अर्जुन बापर्डेकर

आचरा येथील योग शिक्षक अशो

क कांबळी यांच्या मुद्रा बंध योग वर्गाच्या ३२ते८३वयोगटातील साधकांनी रामेश्वर मंदिर येथील ४१दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवात संगीताच्या तालावर सादर केलेल्या योग प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली.यानंतर संगीताच्या तालावर प्राणायाम,सुर्य नमस्कार,उभी आसने,गोमुखासन,टाळी योग आदी आसने ओम् कार स्वरुपा,गगन सदन यासारख्या गीतांवर सादर करत योगाचे जीवनातील महत्त्व स्पष्ट केले.कार्तक्रमाच्या शेवटी योग शिक्षक अशोक कांबळी यांनी शिर्शासन करून कार्यक्रमाचा समारोप केला.या कार्यक्रमाला ८८वर्षाचे जेष्ठ नागरिक लक्ष्मण आचरेकर आणि ८२वर्षाचे गोपाळ खेडेकर सर यांनी शुभेच्छा देताना योग प्रसारासाठी अशोक कांबळी यांच्या योगदानाबद्दल धन्यवाद व्यक्त केले.