जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत तनुजा बारसकर प्रथम

चिपळूण (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या सयुक्त विद्यमाने तसेच कराटे असोसिएशन ता. जि. रत्नागिरी यांच्या तांत्रिक सहकार्याने जिल्हा क्रीडा संकुल मारुती मंदिर, रत्नागिरी येथे दि. २१ ऑक्टोबर रोजी झालेल्या १७ वर्षा खालील मुली जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेत आपल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाची इ. ११ वी विज्ञान शाखेतील कु. तनुजा नितीन बारसकर या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक (गोल्ड मेडल) प्राप्त केला आहे.
तसेच तिची नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याने संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयांचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.