लांजा (प्रतिनिधी) : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या जिजाऊ मोफत पोलीस भरती अकॅडमी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी च्या वतीने उद्या रविवारी २५ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय महा पोलीस डेमो भरती चे आयोजन करण्यात आले आहे
आयोजित.
कोकणातील तरुण पोलीस सेवेत भरती व्हावेत यासाठी जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे प्रयत्नशील आहेत. याच उद्देशाने संस्थेच्या वतीने ही डेमो पोलीस भरती आयोजित केली जाते. ही डेमो भरती पूर्णपणे निशुल्क असून रविवारी २५ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता ए. एस. पी. कॉलेजचे मैदान, देवरुख या ठिकाणी होणार आहे. या डेमो भरतीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची २४ ऑक्टोबर रोजी रात्री निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रविवारी २५
ऑक्टोबर रोजी नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मी पोलीस डेमो भरती रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित आहे. तसेच या डेमो भरती अंतर्गत विजेत्याना बक्षीस दिले जाणार आहेत
. प्रथम क्रमांक स्पर्धकास रुपये ११ हजार, द्वितीय क्रमांक ९०००, तृतीय क्रमांक ,७०००, चौथ्या क्रमांकास ५००० आणिच पाचव्या क्रमांकास ५००० रुपये अशी बक्षिसे दिल जाणार आहेत. या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिजाऊ संस्थेच्या वतीने
करण्यात आले आहे.













