वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेगवेगळ्या प्रकारातली नाटके लोककलेच्या रूपात लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या पसंतीस देखील उतरली याच गोष्टींमुळे आर्ट बिट्स फाऊंडेशन पुणे यांनी म्हापण येथील कलाकार कु. अक्षय ठाकुर यांना थेट महाराष्ट्र युवा कलागौरव पुरस्कारासाठी नोमिनेशन दिले होते. त्या पुरस्कारांचा वितरण सोहळा पुर्ण झाला असुन म्हापण मधिल कुमार अक्षय अवधूत ठाकुर यांना “फोक ड्रामा रायटर” या विषेश कॅटेगरी मध्ये “महाराष्ट्र युवा कलागौरव पुरस्कार २०२६” देऊन गौरवण्यात आले.
यावेळी आर्ट बिट्स फाऊंडेशन पुणे चे संस्थापक श्री संतोष पांचाल यांच्याकडुन सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, मेडल, शुभेच्छा पत्र प्रदान करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यामुळे ठाकूर यांचे म्हापण पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
नाट्यलेखक अक्षय ठाकुर हे नाव सध्या बर्याच नाट्य कथांमध्ये दिसत आहेत. यामध्ये कुडाळ आंबडपाल येथे असलेल्या श्री मच्छिंद्रनाथांचा तपोभूमी व शाबरीमंत्राचे महत्व सांगणारे “देवडोंगर” नाटक असो किंवा निजरूप दाखवा सारखे गित गाणारे संत दामाजीपंत यांचा जीवनचरित्रावरिल आध्यात्मिक नाटक “सत्वपरीक्षा श्री दामाजीपंत” हे नाटक असो किंवा कृष्णभक्ती तथा संत मीराबाई यांचा संपुर्ण जीवन चरित्र सांगणारे एकमेव ऐतिहासिक दशावतारी नाटक “श्रीकृष्ण मीराभेट” किंवा नुकतेच वालावल येथे पार पडलेले “लीला शिवपार्वती पुत्रांची अर्थात देवासुर संग्राम” हे संयुक्त नाटक असो या सारख्या नाटकांचे लेखन केले आहे. त्यांच्या या कलेची दाद म्हणून हा पुरस्कार देण्यात आला.













