सावंतवाडी:अभिनव फाउंडेशन, सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने दीपावलीच्या औचित्यावर सावंतवाडी येथील ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर भव्य दीपोत्सवाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. हा दीपोत्सव मंगळवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता श्रीमंत शिवरामराजे पुतळ्यानजीक मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
दीपोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणून नागरिकांसाठी एक विशेष ‘दीपावली शुभेच्छा सेल्फी पॉईंट’ उभारण्यात येणार आहे. यासोबतच इतर विविध आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल देखील या प्रसंगी पाहायला मिळणार आहे.
ऐतिहासिक मोती तलावाच्या विलोभनीय परिसराला दिव्यांच्या प्रकाशाने उजळवून टाकण्यासाठी सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहावे आणि या सोहळ्याची शोभा वाढवावी, असे जाहीर आवाहन अभिनव फाउंडेशन, सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.













