पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटीची कार्यकारिणी बिनविरोध; अनिल कांदळकर यांची अध्यक्षपदी निवड 

मसुरे | झुंजार पेडणेकर :शंभर टक्के निकालाची परंपरा असलेल्या पोईप येथील सौ. इंदिराबाई द. वर्दम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या ‘पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटी’च्या नवीन कार्यकारिणीची निवडणूक बिनविरोध झाली. यात अनिलभाई कांदळकर यांची सलग चौथ्या वेळी अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

उपाध्यक्ष: गोपीनाथ पालव,

सचिव: विलास माधव,

सहसचिव: महेश पालव,

खजिनदार: महेंद्र पालव,

संचालक श्री. सत्यवान पालव, नामदेव पुजारे, सुरेश नेरुरकर, महेश माधव, विश्वनाथ नाईक, मोहन घाडीगांवकर,

सल्लागार – सुहास पालव, नितीन नाईक

यांची निवड झाली.

यावेळी बोलताना मान्यवरांनी अनिल कांदळकर यांच्या २० वर्षांच्या यशस्वी शैक्षणिक प्रवासाचा व त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशालेच्या झालेली प्रगती (सुसज्ज इमारत, भव्य सभागृह, क्रीडा सुविधा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेला नावलौकिक) यांचा गौरव केला. तसेच प्रशालेचे प्राचार्य विकास कुंभार यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.