कुडाळ :
आधुनिक महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेचा वैचारिक वारसा जपण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने रविवार, दि. २६ जुलै रोजी दुपारी ४ ते ७ या वेळेत कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये महाराष्ट्रधर्म शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात डॉ. दीपक पवार व डॉ. प्रकाश परब प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
मराठी भाषा, संस्कृती व सामाजिक सलोखा यांसमोरील आव्हानांवर या शिबिरात विचारमंथन होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.











