कलमठ येथील महिला बेपत्ता

कणकवली : कलमठ -लांजेवाडी येथील स्नेहा सुहास चव्हाण (वय ४८ )ही महिला आपल्या राहत्या घरातून १४ आॅक्टोबर रोजी बेपत्ता झाली आहे. तिचा शोध घेऊनही न सापडल्याने तिचे अपहरण झाल्याची तक्रार कणकवली पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

स्नेहा चव्हाण ही आपल्या सासू समवेत राहत असे. १४ रोजी सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत ती घरातून पिशव्या घेऊन निघून गेली. त्यावेळी सासू कामाला गेली होती. तिचा शोध घेऊनही ती सापडलेली नाही एक वर्षापूर्वी तिच्या पतीचे निधन झाले होते. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याबाबतची फिर्याद तिच्या सासूचा भाचा गणेश सोमा चव्हाण (कलमठ- लांजेवाडी) यांनी दिली.अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.