मालवण येथे तालुकास्तरीय भव्य गणेश मूर्ती प्रदर्शन 

दीपावली निमित्त दत्त मंदिर येथे जवळपास 45 मूर्तीकरांचे कौशल्य साकारणार 

पाच सर्वोत्कृष्ट मूर्तिकारांची लकी ड्रॉ द्वारे निवड करून केले जाणार सन्मानित 

 चौके l प्रतिनिधी :- दीपावलीच्या शुभमुहूर्तावर प्रथमच सिंधु गणेश मूर्तिकार कारागिर सहकारी संस्था( रजि.) मालवण च्या वतीने

जवळ पास 45 च्या वर युवा व नामांकित मूर्तिकारांच्या हस्त कौशल्यातुन साकारलेल्या गणेश मुर्त्यांचे भव्य प्रदर्शन श्री दत्त मंदिर भरड मालवण येथे मंगळवार दिनांक 10 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10.00 ते रात्री 11:30 यावेळेत आयोजित करण्यात आले आहे.

 

या प्रदर्शन कार्यक्रमाचे उदघाटन जिल्ह्यातील ज्येष्ठ मूर्तिकार तसेच उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते होणार असून या प्रथमच भरवण्यात आलेल्या गणेश मूर्ती प्रदर्शनात विशेष उल्लेखनीय मुर्त्याना निवडून लकी ड्रॉ द्वारे पहिल्या पाच मूर्तिकारांना सन्मानित करण्याची संधी तालुक्यातील नामांकित मूर्तीदारांना प्राप्त होणार आहे.

 

सिंधुदुर्गातील मूर्तिकारांच्या कलागुणांना वाव मिळवून कला, आर्थिक,सांस्कृतिक,सामाजिक सर्वांगीण विकास साधून सिंधुदुर्ग जिल्हा मूर्तीकलेचे माहेरघर बनविण्याचा संस्थेचा मानस असून या दिमाखदार मूर्ती प्रदर्शनास सर्वांनी सहकुटुंब मित्रपरिवार सहित उपस्थित राहुन मूर्तिकराच्या कलागुणास प्रोत्साहित करावे असे आवाहन सिंधू गणेश मूर्तिकार कारागीर सहकारी संस्था (रजि.) मालवण तालुका यांच्यावतीने करण्यात आलेली आहे.