लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाले गणेश मूर्तीचे अनावरण
वेंगुर्ले : दाजी नाईक
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला-दाभोसवाडा येथे साकारण्यात आलेली गणपतीची १८ फुटी भव्य मूर्ती लक्षवेधी ठरत आहे. या गणेश मूर्तीचे अनावरण रविवारी लक्ष्मी पूजनादिवशी सायंकाळी करण्यात आले असून त्यानंतर बहुसंख्य नागरिक याठिकाणी भेट देऊन या भव्यदिव्य गणेश मुर्तीचे दर्शन घेत आहेत.
वेंगुर्ला-दाभोसवाडा येथील शौर्य प्रतिष्ठानच्यावतीने दिवाळी सणाचे औचित्य साधून १८ फुट उंचीची भव्यदिव्य अशी गणपतीची मूर्ती साकारण्यात आली आहे. आकर्षक सजावटीमध्ये उभी असलेली ही गणेश मूर्ती लक्षवेधी ठरत आहे. रविवारी लक्ष्मी पूजनादिवशी सायंकाळी फटाकांच्या आतषबाजीत ही मूर्ती नागरिकांना पहाण्यासाठी खुली करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक सचिन शेट्ये, रवी शिरसाट, विशाल परब मित्रमंडळाचे साई भोई, शाम कुबल, गणेश मूर्तीकार रोशन केळुसकर, शौर्य प्रतिष्ठानचे राजेश शेळके, कौस्तुभ आरोलकर, श्याम खोबरेकर, कामिल फर्नांडिस, आग्नेल फर्नांडिस, बाळू लोणे, सदाशिव लोणे, आयेशा हुले, स्वप्नाली बटवलकर, सई सातार्डेकर, स्नेहल कोले, मानसी आरोलकर, राजश्री शेळके यांच्यासह शौर्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, ही गणेश मूर्ती २१ नोव्हेंबरपर्यंत दर्शनासाठी खुली राहणार आहे. सकाळपासून ते रात्री ११वाजेपर्यंत या गणपतीचे दर्शन घेता येणार आहे.













