सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे यांना मातृशोक!

 मसुरे | प्रतिनिधी
जांभवडे येथील श्रीमती सीताबाई रामचंद्र तर्फे (वय ८४) यांचे १७ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास कणकवली येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

श्री. वामन तर्फे यांच्या जडणघडणीत आणि आयुष्याच्या वाटचालीत सीताबाई यांचे योगदान मोलाचे होते. श्रीमती सीताबाई तर्फे यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, जावई, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडेचे मुख्याध्यापक तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. वामन रामचंद्र तर्फे यांच्या मातोश्री होत. जांभवडे येथे अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.