सावंतवाडी :
मुळच्या सावंतवाडी-निरवडे येथील मुंबईस्थीत माहिम राववाडी येथील रहिवासी प्रतिभा आत्माराम जोशी (८२) यांचे काल सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.
माटुंगा,माहिम परिसरात समाजसेवेची आवड असणाऱ्या प्रतिभा जोशी या ‘प्रेमळ काकी ‘ म्हणून प्रसिद्ध होत्या , परिसरातील महिला, मुली,कौटुंबिक कलह ,बेरोजगारांच्या समस्या सोडवण्यात,मार्गदर्शन करण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा , ऐंशीच्या दशकात रोजगारासाठी सिंधुदुर्गातून मुंबईत आलेल्या अनेक होतकरू तरुणांसाठी जोशीकाकी मोठा आधार होत्या , काल दुपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माहिम , माटुंगा विभागातील समाजसेवी संघटनांचे पदाधिकारी,सर्व पक्षीय राजकीय कार्यकर्ते,नातेवाईक आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात मुली गीता तोरसकर,सुंदर शेलार,जावई आत्माराम तोरसकर , सुनिल शेलार, पुतण्या शिवाजी ,दिपक नात अनूजा,नातू तनिष्क,प्रथमेश ,सुन पूजा ,प्रज्वल असा मोठा परिवार आहे.









