बाबा टोपले मित्रमंडळाच्या वतीने ‘नरकासूर स्पर्धा’ 

दोडामार्ग l प्रतिनिधी :दिवाळी सणानिमित्त दोडामार्ग तालुका मर्यादित ‘नरकासूर स्पर्धे’चे आयोजन बाबा टोपले मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. ही स्पर्धा ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे.

 

बाबा टोपले यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी नागेश टोपले (मोबा. ७०८३३५८९४२) यांच्याशी १७ नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी ४ वाजेपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन बाबा टोपले मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून प्रथम पारितोषिक ₹ ७,०००/-, द्वितीय पारितोषिक ₹ ५,०००/-, तृतीय पारितोषिक ₹ ३,०००/- तर उत्तेजनार्थ ₹ २,०००/- अशी बक्षिसे आहेत.

 

तालुक्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन बाबा टोपले मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.