कांदळगाव येथील हॉलिबॉल स्पर्धेत कोचरा संघ विजेता!

मसुरे | झुंजार पेडणेकर :कांदळगाव येथील सरपंच चषक हॉलिबॉल स्पर्धेत कोचरा संघाने चिवला बीच मालवण संघावर मात करत अजिंक्य पद पटकावले. सरपंच रणजीत परब यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाट्न झाले. यावेळी

उपसरपंच राजेंद्र कदम, माजी सरपंच सौ उमदी परब,

जिल्हा प्रकल्प अधिकारी – राजेश कांदळगावकर, ग्रामपंचायत

सदस्य विहार कोदे , शारदा मुळये,

माजी उपसरपंच आनंद आयकर,

ग्रामस्थ – दादा परूळेकर, महेश परूळेकर, उमेश सावंत, आशिष आचरेकर, महेंद्र कदम, रमण कदम, श्यामा मुळये, तसेच हॉलिबॉल क्लब कांदळगावचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मान्यवरानी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचलन आशिष आचरेकर यानी केले.