रत्नागिरी :
श्रीमती मीनल मनोज हळदणकर,
ग्रंथपाल, रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय, रत्नागिरी यांना सन २०२४-२५ या वर्षासाठी डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) – विभागस्तरीय पुरस्कार (मुंबई विभाग) जाहीर झाला आहे.
ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी, वाचकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी आणि ग्रंथालय चळवळीच्या विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची ही यथोचित पावती म्हणून हा पुरस्कार घोषित झाला आहे.
सौ. हळदणकर या गेली अनेक वर्षे रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात काम करत आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.













