देवरूख (प्रतिनिधी):
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागामार्फत बालदिनाचे औचित्य साधून सोनवडे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता ५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेत लहान गट व मोठा गट अशा दोन गटांत सुमारे २७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
स्पर्धेशीची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आली. यावेळी सोनवडे हायस्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी बंडगर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वक्तृत्व स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, विचार मांडण्याची क्षमता आणि भाषिक कौशल्ये विकसित होतात असे सांगितले. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण सोनवडे हायस्कूलच्या शिक्षिका सुलेखा मोहिते व प्रा. वसंत तावडे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी प्रा.सीमा कोरे, प्रा. मयुरेश राणे, प्रा. स्वप्नाली झेपले व प्रा. अभिनय पातेरे यांनी मेहनत घेतली.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
लहान गट :
प्रथम क्रमांक: आयुष निलेश जाधव(इयत्ता ६वी),
द्वितीय क्रमांक: गार्गी निलेश शिंदे (इयत्ता ६वी),
तृतीय क्रमांक: शुभ्रा उदय धनावडे(इयत्ता ६वी),
उत्तेजनार्थ: पूर्वी पांडुरंग शिंदे (इयत्ता ६ वी).
मोठा गट :
प्रथम क्रमांक: श्रुतिका विनायक संसारे(इयत्ता ९वी),
द्वितीय क्रमांक: चैत्राली निलेश शिंदे(इयत्ता ९वी),
तृतीय क्रमांक- अस्मि अमृत मेंगाळ(इयत्ता ८वी),
उत्तेजनार्थ- प्राची विनायक राईन(इयत्ता ८वी),
उत्तेजनार्थ: सृष्टी विठ्ठल राऊत (इयत्ता ९वी).
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी स्वयंसेवक कस्तुरी गीते हिने केले, तर साक्षी विश्वास हिने आभार प्रदर्शन केले.













