पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक

तेजस्वी शतक देवाच्या चरणी विसावत आहे :मोदींचे ट्विट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. पीएम मोदींनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. मोदींनी ट्विटमध्ये लिहिले की, “तेजस्वी शतक देवाच्या चरणी विसावत आहे… आईमध्ये, मला नेहमीच ते त्रिमूर्ती जाणवले आहे, ज्यामध्ये एका तपस्वीचा प्रवास, निस्वार्थी कर्मयोगी आणि वचनबद्ध जीवनाचा समावेश आहे. ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, बसपा सुप्रीमो मायावती यांच्यासह अनेकांनी हिराबा यांना श्रद्धांजली वाहिली.