ह. भ. प. शरददादा बोरकर प्रतिष्ठान, वरवडे यांचे आयोजन
रत्नागिरी |
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती तथा संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि आयुर्वेदाचे जाणकार ह. भ. प. शरददादा बोरकर प्रतिष्ठान, वरवडे ता. जि. रत्नागिरी यांच्या वतीने वै. ह. भ. प. शरददादा बोरकर यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील योगदानासह पत्रकारिता या क्षेत्रातील अत्त्युच्च योगदानाबद्दल दै.सागर चे प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण यांना पत्रकारभूषण पुरस्कार हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
तर याचं कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल आशिष भालेकर यांना समाज भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम शनिवारी 31 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता खंडाळा हायस्कुल येथे होणार आहे.