दोडामार्ग (प्रतिनिधी) :सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते गणेश देसाई यांचा ‘वसंत स्मृती आदर्श शिक्षकेतर पुरस्कार २०२६’ देऊन नुकताच ठाणे येथे गौरव करण्यात आला आहे. शिक्षक आघाडी व भारतीय जनता पार्टीच्या कोकण विभाग आणि समन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
शिक्षण व शिक्षकेतर क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना वसंत स्मृती आदर्श लिपिक पुरस्कार 2026 या प्रतिष्ठित पुरस्काराने आमदार ॲड. निरजन डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ )आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार कौतुभ गावडे आ. माधवी नाईक आदीच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.













