रत्नागिरी | प्रतिनधी : रविवार दिनांक २७/८/२०२३ रोजी झालेल्या प्राथमिक शिक्षक पतपेढी वार्षिक अधिमंडळ सभेत संस्था अध्यक्ष विलास जाधव यांनी सर्वांचे स्वागत करून सभेला सुरुवात केली. दिवंगत सभासद तथा दिवंगत थोर व्यक्ती यांना श्रध्नांजली वाहिली. तदनंतर पतपेढीचे अध्यक्ष यांनी त्यांचे निवेदनात अहवाल वाचन केले. अतिशय अभ्यासपूर्ण निवेदन दिल्यानंतर काही सभासदांच्या प्र्शानंवर त्यांनी खुलासेवार उत्तरे दिली. त्यानंतर सेवानिवृत्त झालेले माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक यांचा,राष्ट्रीय राज्य,जिल्हा परिषद व नगर परिषद पुरस्कारप्राप्त शिक्षक बंधू भगिनींचा व scert मार्फत घेण्यात येणाऱ्या नवोपक्रम निबंध स्पर्धेत प्रथम ५ क्रमांकात आलेल्या सभासादांचा तसेच संस्थेच्या पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
तदनंतर दिनांक १७ जुलै २०२२ रोजी झालेल्या वार्षिक अधिमंडळाच्या वार्षिक बैठकीचे प्रतिवृत्त बहुमताने कायम करण्यात आले.मागील संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयांची उदा.१) नफातोटा पत्रक,ताळेबंद व अंदाज पत्रक बहुमताने मंजूर करण्यात आले २)संस्थेची जागा स्वतःच्या मालकीची असावी.३)खेड तसेच लांजा जागा खरेदीला परवानगी ४}चिपळूण मधील बांधकाम उत्कृष्ट केल्याबद्दल संचालक मंडळाचे अभिनंदनाचे ठराव बहुमताने मंजूर करण्यात आले.तसेच संस्थेच्याआर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये सुमारे झालेल्या ११ कोटी नफ्यापैकी सर्व सभासदांना शेअर्स वर १५ % डीव्हीडंट तसेच १%कर्ज प्रोत्साहन निधी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.त्याचे वाटप गणेशोत्स्ववाच्या पार्श्वभूमीवर दिनाक १० सप्टेंबर २०२३ पासून होणार आहे.इतिहासात पहिल्यांदा राजापूर मध्ये सभा झाल्याबद्दल उपस्थित सर्व सभासदांनी अध्यक्ष महोदय यांचे अभिनंदन केले.अध्यक्ष महोदय यांनी ३ वाजता सभा संपल्याचे जाहीर केले.










