रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मारुती मंदिर रत्नागिरी येथे, तसेच गांधी मंदिर रत्नागिरी येथे मिरवणूक काढण्यात येणार असल्याने शहरातील वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. ही वाहतूक अधिसूचना ०२/०८/२०२५ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत लागू राहील.
वाहतूक मार्गातील बदल:
* साळी स्टॉप ते माळनाका तेथे वाहतूक बंद राहील.
* साळी स्टॉप-नाचणे-लिंबे रोड-आय.टी.आय-अध्यक्ष नगर-पॉवर हाऊस-गजानन महाराज मंदिर-हिंदू कॉलनी मार्ग-चिंवा पॅलेस रोड या मार्गावरून वाहतूक वळविण्यात येईल.
नागरिकांनी तसेच वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.










