गोविंदासाठी ११ लाख बक्षिसांची खैरात
महिलांसाठी वेगळे पारितोषिक
चिपळूण (वार्ताहर) : अक्षय तृतीयेच्या सुमुहूर्तावर दि. 22 एप्रिल रोजी नव्याने स्थापन झालेल्या बळीराज सेनेच्या माध्यमातून प्रथमच मुंबई जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड जोगेश्वरी पूर्व येथे दहीहंडी उत्सव आयोजित केला आहे. २ लाख 51 हजार 111 रुपयांचे प्रथम पारितोषिक, महिलांसाठी वेगळे बक्षित आणि सलामी थर लावणाऱ्या गोविंदांना सुद्धा वेगळे पारितोषिक देण्यात येणार आहेत. बळीराज सेनेच्या माध्यमातून एकूण ११ लाख रुपयांची बक्षिसांची खैरात गोविंदासाठी होणार आहे.
बळीराज सेना पक्ष कमी कालावधीत आपले राजकीय अस्तित्व संपूर्ण महाराष्ट्रभर प्रस्थापित करीत आहे. सर्व समाजातील कष्टकरी बांधवांना एकत्रित घेत बळीराज सेना पक्ष वाटचाल करीत आहे. दि. ७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या दहीहंडी उत्सवात सुद्धा बळीराजा सेनेच्या माध्यमातून मुंबईमध्ये प्रथमच दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
एक आगळे वेगळे आयोजन या गोविंदांसाठी बळीराज सेनेने केलेले आहे .यामध्ये प्रथम पारितोषिक २ लाख ५२हजार १११ रुपये ठेवण्यात आलेले आहे. महिलांसाठी २१ हजार १११ रुपये आणि स्थानिक राखीवांसाठी २१ हजार १११ रुपयांची पारितोषिके ठेवलेली आहेत.
त्याचबरोबर आठ थरांची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला २१ हजार १११ रुपये, सात थरांची सलामी देणाऱ्या गोविंद पथकाला ११,१११ रुपये, सहा थरांची सलामी देणाऱ्यांना ३ हजार १११ रुपये आणि पाच थरांची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला २१ हजार १११ रुपये पारितोषिक बळीराजा सेनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. प्रत्येक गोविंदा पथकाला बक्षीस व आकर्षक सन्मान चिन्ह देऊन पक्ष प्रमुख अशोक वालम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. एकूण सुमारे 11 लाख रुपयांची पारितोषके या दहीहंडी उत्सवामध्ये देण्यात येणार आहेत.
प्रथमच पक्षाची स्थापना करून दहीहंडी उत्सवामध्ये गोविंदा पथकांसाठी मोठ्या रकमेची पारितोषिक लावून बळीराज सेनेने सुद्धा आपले राजकीय वर्तुळातील अस्तित्व सिद्ध केलेले आहे. मुंबई येथील गणेश विसर्जन तलाव श्याम नगर मजास डेपो शेजारी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड या ठिकाणी हा दहीहंडी उत्सव होणार आहे. या दहीहंडी उत्सवासाठी पक्ष प्रमुख अशोक वालम आणि सर्व पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. या उत्सवात सर्व गोविंद पथकानी सहभाग घ्यावा, असे आवाहन बळीराज सेनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
चौकट
पुढील वर्षी होणाऱ्या दहीहंडी उत्सवात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून बळीराज सेनेच्या माध्यमातून दहीहंडी उत्सव करण्यात येईल, असेही बळीराज सेनेकडून सांगण्यात आले आहे.












