कुणबी ग्रामविकास मंडळच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव
चिपळूण ( वार्ताहर) : कुणबी ग्रामविकास मंडळ ,निवळी, पालवण, ढोक्रवली संघटनेच्याच्या वतीने विद्या शैक्षणिक गुणवत्तेचे कौतुक आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी गुणवंत विद्यार्थी सोहळ्याचे आयोजन रविवार 3 सप्टेंबर रोजी, पालवन येथे करण्यात आले होते. शिक्षण हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे असा संदेश संघटनेने विद्यार्थ्यांना दिला.
निवळी , पालवन आणि ढोक्रवली या तीन गावची संघटना सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करत आहे. अनेक उपक्रम राबवत संघटनेचा पाया भक्कम करीत आहेत. विद्यार्थी म्हणजे देशाचे भावी आधरस्तंभ आहेत, याची जाणीव ठेवत कुणबी ग्रामविकास मंडळ यांनी दरवर्षीप्रमाणे विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम घेतला. मुलांच्या गुणवत्तेचा सन्मान संघटनेने केला.
ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षेला बसणारे हुशार विद्यार्थी तयार व्हावे हे संघटनेचे शैक्षणिक धोरण आहे.
यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष श्रीराम डिके, उपाध्यक्ष शरद भुवड, माजी उपसभापती शरद शिगवण, दिलीप कोदारे, निवळी उपसरपंच मनोज डिके, शिवाजी कोदारे,दत्ताराम भुवड, सचिव बाळकृष्ण लांबे ,कमलाकर भुवड, गणपत साठले, निवळी तंटामुक्ती अध्यक्ष अनंत कोदारे , खजिनदार बबन राणीम ,गणपत राणीम ,मनोज घाणेकर, पालवण तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद भुवड, सर्व कुणबी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय खोचाडे यांनी केले.












