कासरल तंटामुक्त अध्यक्ष पदी राजेश सावंत यांची निवड

कणकवली :महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेंतर्गत ग्रामपंचायत कासरल तंटामुक्त अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुचविण्यात आलेल्या श्री. राजेश बाळकृष्ण सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी त्यांचे अभिनंदन करताना व शुभेच्छा देताना सरपंच, उपसरपंच व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते व कासरल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.