ओटवणे(प्रतिनीधी) ओम श्री सदगुरु समर्थ अवधूतानंद महाराज सेवा मंडळ मुंबई यांनी आयोजित केलेल्या माडखोल प्रभागस्तरीय मर्यादित वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा दाणोली बाजार ची विद्यार्थिनी कु. सानिया सिकंदर शिदलाळे हिने प्रथम क्रमांक पटकावला.या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.मात्र या सर्वांवर मात करत आपल्या सुंदर वकृत्वाच्या जोरावर सानिया हिने परिक्षकांची मन जिंकत प्रथम क्रमांक पटकावला तिला ट्रस्ट चा वतीने प्रशस्तीपत्रक आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. व तिचे अभिनंदन करण्यात आले.तिला मुख्याध्यापक श्रीम.मेस्त्री मॅडम,श्रीम शेख मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.












