आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
वैभववाडी प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी वैभववाडी पुरस्कृत तसेच महाकाली कंट्रक्शन वैभववाडी आयोजित दहीहंडी उत्सव गुरुवार दि. 8 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. या प्रसंगी कणकवली, देवगड व वैभववाडी मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत.
महाकाली कंट्रक्शनच्या वतीने गेली अनेक वर्ष दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. याहीवर्षी येथील इनामदार प्लाझा येथील भव्य पटांगणावर हा उत्सव संपन्न होणार आहे. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला 51 हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. या उत्सवात सहभागी गोविंदा पथकांना सन्मानचिन्ह व रोख रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. या दहीहंडी उत्सवात लावण्यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी तसेच सिने कलाकार या उत्सवाची रंगत अधिक वाढविणार आहेत. दहीहंडी उत्सवात मुंबई, रत्नागिरी कोल्हापूर व जिल्ह्यातील गोविंदा पथक सहभागी होणार आहेत. तरी या उत्सवात मोठ्या संख्येने नागरिकांनी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, बालगोपाळांनी सहभागी व्हावे. असे आवाहन उद्योजक विजय तावडे, कौस्तुभ तावडे, विनय राणे यांनी केले आहे.










