गणेश भक्तांसाठीही विशेष सवलत योजना
रत्नागिरी : रा.प. महामंडळाची प्रतिष्ठेची व कोकणवासीय गणेशभक्तांची जिव्हाळ्याची गणपती जादा वाहतूक सुरू होत असून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून मुंबई, बोरिवली, नालासोपारा, ठाणे,पुणे इत्यादी मार्गावर गणेश भक्त प्रवासांच्या सोईसाठी रा.प. बसेसमधुन जादा वाहतूक करण्यात येणार आहे. त्यासाठी रा.प. रत्नागिरी विभागाचे पुढीलप्रमाणे नियोजन केले आहे.
मुंबईकडून रेल्वेने येणाऱ्या रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील प्रवासांच्या सोईसाठी १४ सप्टेंबर पासून रत्नागिरी रहाटघर बसस्थानकातून सुटणा-या राजापूर, देवरूख, लांजा या मार्गावर जाणाऱ्या सर्व ग्रामीण फेऱ्या या व्हाया रत्नागिरी रेल्वे स्टेशन करून पुढे मार्गस्थ होणार आहेत. रत्नागिरी रेल्वेस्थानकावर गणेश भक्त प्रवासांच्या सोईसाठी १९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत रत्नागिरी आगाराकडून तात्पुरत्या स्वरूपाचा वाहतूक नियंत्रण कक्ष उभारून तेथे प्रवासांच्या माहिती व मार्गदर्शनासाठी वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. गणपती परतीची जादा वाहतूक २३ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत रत्नागिरी विभागातील सर्व आगाराकडून करण्यात येणार असून प्रवासांच्या मागणीप्रमाणे ग्रुप बुकिंग असल्यास इच्छीत ठिकाणापासून ४२ आसनीय गाडी उपलब्ध करून देण्यात येईल. परतीच्या जादा वाहतूकीचे आगाऊ आरक्षण ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध असून सदर सुविधा सध्या विभागातील सर्व आगारात, बस स्थानकावर संगणकीय प्रणालीमार्फत आरक्षण खिडकीवर तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील ४८ खाजगी आरक्षण एजंट उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवासी स्वतःच्या इंटरनेट प्रणालीमधून एमएसआरटीसी रिझर्हेशन ॲप हे प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करून स्वतः देखील त्याद्वारे आपले आगाऊ आरक्षण तिकीट बुकिंग करू शकतात.
गणेश भक्तांच्या सोयीसाठी महामंडळाच्या विशेष सवलत योजना
४४ प्रवासी उपलब्ध झाल्यास थेट गावामधुन मुंबई पर्यंत बस उपलब्ध करून देण्यात येईल. गणेश भक्त प्रवाशी वर्गासाठी यंदा प्रथमच महिलावर्ग ५० टक्के तिकीट व ७५ वर्षावरील नागरिकांना शून्य दरात आरामदायी व सुरक्षित प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ७५ वर्ष पुर्ण असलेल्या सर्व प्रवाशांना रा.प.बसमधुन १०० टक्के मोफत प्रवास. सर्व महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के तिकीट दरात सवलत. ६५ वर्ष पूर्ण असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना रा.प.बसमधून ५० टक्के तिकीट दरात सवलत देण्यात आली आहे.
आगार व्यवस्थापक व स्थानक प्रमुख संपर्क क्रमांक अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहेत. दापोली – ७३५०५१५५४४, ९८९०४३८८७७. खेड – ९८६००४९९२५, ८६००३९९४५१. चिपळूण – ८०८७३५८६७२, ७०२०३५१३५२. गुहागर – ९८९०३६८१९७, ८७८८७००९५७. देवरुख – ९४२१२३३६३७, ८०८०७७४५८६.रत्नागिरी – ७५८८१९३७७४, ९८५०८९८३२७.लांजा – ९९२१४३५४६८, ९७३०३९२२७७. राजापूर – ९८६५३४०४७९, ९४०४३३१९७९. मंडणगड – ९७६२०६५४००, ९४०३५०५७५६.










