लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील कोलधे कुंभारगाव येथील श्री कालिका माता मंदिर जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठापना सोहळा शुक्रवार दिनांक १५ मार्च ते रविवार दिनांक १७ मार्च या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात साजरा करण्यात येणार आहे.
कोलधे कुंभारगाव येथे श्री कालिका मातेचे भव्य असे मंदिर उभारण्यात आले आहे .या निमित्ताने जिर्णोद्धार आणि प्राण प्रतिष्ठापना सोहळा शुक्रवार दिनांक १५ मार्च 15 मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता मूर्ती गावच्या सीमेवरून वाजत गाजत मंदिरात मिरवणूक ,त्यानंतर ८.३० ते दुपारी २ पुण्याहवन, जलाधिवास, रात्री ७.३० ते साडेनऊ या वेळेत हरिपाठ भजनाचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार दिनांक १६ मार्च रोजी सकाळी ८.३० ते २ शय्याधिवास ,हवन त्यानंतर दुपारी ३ ते ५ मूर्ती गाव मिरवणूक, रात्री ७.३० ते ९.३० वाजता भजनाचा कार्यक्रम होईल. त्याचप्रमाणे रविवार दिनांक १७ मार्च रोजी दुपारी १ ते रात्री १९ वाजता तत्वज्ञास, सायंकाळी ६.३० ते ७ ३० प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा, ह भ प १०८ गुरु महादया रविशंकर ,शिवाचार्य महाराज रायपाटण) ७.३० ते ९.३० महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून रात्र साडेनऊ ते दहा ते वाजता भजन( आनंद सांप्रदाय भजन मंडळ कुंभारवाडी) आणि रात्र साडेदहा वाजता पालखी प्रदक्षिणा होणार असून त्यानंतर सह्याद्री मालेश्वर कलामंच पाटगाव यांच्या बहुरंगी नमनाचा कार्यक्रम होणार आहे.











