न्याय व अधिकार माहितीसाठी माहिती अधिकार दिन साजरा व्हावा- जिल्हा प्रचारप्रमुख योगेश पेढांबकर

 

चिपळूण (प्रतिनिधी) : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा देशभरात सन २००५ पासुन लागू करण्यात आला असून शासनाने वेळोवेळी उचललेल्या पावलांमुळे अल्पावधीतच राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरुपात लोकाभिमुख झाला आहे. महाराष्ट्रात माहितीचा अधिकार अधिनियम २००५ या कायदयाच्या व्यापक प्रसिध्दीसाठी व प्रभावी अंमलबजावणीकरीता शासन स्तरावरुन सर्वतोपरी उपाययोजना करण्यात यावी. जनसामान्यांना त्यांचे न्याय व अधिकार माहिती होण्यासाठी माहिती अधिकार दिन साजरा व्हावा, अशी मागणी जिल्हा प्रचारप्रमुख योगेश पेढांबकर यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दि. २८ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय हा स्तरावर दिवस कायद्यातील तरतुदी, कार्यपध्दती, याबाबत श्री. पेढांबकर यांनी विविध दृकश्राव्य माध्यमातून व्यापक प्रसिध्दी देऊन व विविध उपक्रम राबवून त्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यन्त पोहोचविण्यासाठी शासनाने २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन साजरा करण्याचा शासनाच्या निर्देशानुसार साजरा करण्याची मागणी माहिती अधिकार संघटना, चिपळूण या संघटनेने केलेली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिक्षक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, रत्नागिरी, शिक्षणाधिकारी रत्नागिरी यांना देण्यात आले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सर्व शाळा, महाविद्यालये, विदयापिठे व इतर शैक्षणिक संस्थामध्ये माहिती अधिकार या विषयावर आधारीत प्रश्नमंजुषा, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा तसेच चर्चासत्र व व्याख्यानमाला आयोजित करावी. यासाठी अशासकिय समाजसेवी संस्थांचा सहयोग घेण्यात यावा. हा उपक्रम व्यापक पातळीवर जनसामान्यांना त्यांचे न्याय व अधिकाराबाबत माहिती माहिती होण्यासाठी माहिती अधिकार कायदा प्रभावशाली ठरत अधिकार दिन म्हणून साजरा असून माहिती अधिकार दिन साजरा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.