तालुका विधी सेवा समिती लांजाच्या वतीने लांजा शाळा नंबर १ मध्ये जागतिक साक्षरता दिन संपन्न

लांजा (प्रतिनिधी) लांजा तालुका विधी सेवा समितीच्या वतीने जि.प.शाळा लांजा क्रमांक १ येथे जागतिक साक्षरता दिन कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश लांजा पी.आर.भोसले हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे पॅनल विधीज्ञ ॲड.अभिजीत जेधे, शाळेचे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख व्यंकटेश आटक, तालुका विधी सेवा समितीच्या कायदासाथी श्रीमती स्वप्ना सावंत तसेच कर्मचारी सौ. एस.एस. गवळी, सौ. के. एस. वाडेकर, शाळेतील शिक्षक वर्ग प्रवीण सावंत, दत्ताराम गोरे, सौ.सृष्टी उपशेट्ये, सुचेता कांबळे, लिंगाण्णा भुसनूर ,सौ.दीपिका गमरे, मारुती शिंदे, सौ. रिद्धी शेट्ये, सौ. श्रध्दा कुलकर्णी आदी उपस्थित होते

याप्रसंगी बोलताना न्यायाधीश पी. आर. भोसले यांनी साक्षरता या शब्दाची ओळख आणि साक्षरता दिन साजरा करण्याचे प्रयोजन याबाबतचे महत्त्व विशद केले. ॲड.अभिजीत जेधे यांनी विद्यार्थ्यांना लहान लहान उदाहरणातून साक्षरतेचे महत्व पटवून दिले. तर मुख्याध्यापक आटक यांनी साक्षरतेच्या प्रसार करण्याविषयी मुलांना प्रोत्साहन केले. यावेळी शाळेच्या इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.