देवगड दहीबावं पूरक योजनेवरील पंप दुरुस्त, आ. नितेश राणे यांचे प्रयत्न यशस्वी

देवगड जामसांडे नगरपंचायतीला पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आमदार नितेश राणे यांचे प्रयत्न यशस्वी ठरले असून दहिभाव पाडाघर योजनेतील पंप दुरुस्ती पूर्ण झाली आहे हा पंप आज बसवण्यात आला

शिरगाव पाडाघर योजना ही दुरुस्त झाली असून त्याचा पाणीपुरवठा  देवगडला झाला आहे दहिबाब पूरक पाणी योजना दुरुस्त झाल्याने दहा लाख लिटर पाणी उपसा आता वीस लाख लिटर पर्यंत होणार आहे

याची मोटर दुरुस्त करून आणण्यात आली होती त्याला महिना उलटला आमदार नितेश राणे यांच्या बैठकीनंतर हालचाली तातडीने सुरू झाल्या होत्या

आमदार नितेश राणे यांनी देवगड जामसंडे नगरपंचायतीमध्ये बैठक घेऊन झोपलेल्या नगरपंचायत प्रशासनाला जागे केले होते नवीन नळ पाणी योजनेचे अंदाजपत्रक बनवताना नळ पाणी योजना दुरुस्ती करण्यासाठी लागणारे आठ कोटीचे अंदाजपत्रकही तयार करून घेतले होते यावेळी त्यांच्यासमोर दहिबावं नळ पाणी पूरक योजनेचा प्रश्न चर्चेला आला होता

हा पंप तातडीने दुरुस्त करून बसवा असा आदेश त्यांनी दिला होता हा पंप आता दुरुस्त झाला असून देवगडला पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे