नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांची प्रसिद्धी पत्रकातून माहिती
वैभववाडी l प्रतिनिधी : श्रीराम मंदिर मुर्ती प्राण प्रतिष्ठाना उत्सव सोहळा सोमवार दि. २२ जानेवारी रोजी संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर वाभवे – वैभववाडी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व मटण, चिकन, मच्छी व मद्यविक्री दुकाने बंद ठेवावीत असे आवाहन नगराध्यक्ष नेहा माईणकर व उपनगराध्यक्ष संजय सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने वैभववाडी शहरातील श्री. दत्त मंदिर व अदिष्टी मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात येणार आहे.
या उत्सवानिमित्त शहरातील मटण, चिकन, मच्छी व मद्यविक्री विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेववीत. तसेच चायनीज दुकानदार, मांसाहारी हॉटेल, धाबे या उत्सवानिमित्त बंद ठेवण्यात यावेत.
शहरातील सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.










