चिपळूण (प्रतिनिधी) : अपना सहयोग फाऊंडेशन, ब्रदरहुड फाउंडेशन व सबकी सेवा सामाजिक संस्था तथा अनुवा बायो बँक रिसर्च कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने गोवळकोटरोड फातिमा घर याठिकाणी व खेडमध्ये अपना सहयोग फाऊंडेशन कार्यालय या ठिकाणी बुधवार दि. २० सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी अपना सहयोग फाउंडेशनचे चेअरमन जरीन रुमानी यांनी आरोग्य विषयक तक्रारीच्या निवारणार्थ या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ स्थानिक नागरिकांना घ्यावा. तसेच आपल्या ओळखीच्या लोकांना सुद्धा याबाबत माहिती द्यावी, असे आव्हान त्यांनी यावेळी केले. चिपळूण तालुक्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येला राज्य शासन किंवा नगरपालिका सक्षम हवी. तशी सुसज्ज आरोग्य सुविधा देऊ शकत नाही. अशावेळी अपना सहयोग फाउंडेशन अशा प्रकारची आरोग्य सेवा देत असते. शासनानेही याकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्रीमती जरीन यांनी यावेळी केले.
अपना सहयोग फाउंडेशन यांच्यातर्फे होणाऱ्या या शिबिरात हार्ट, किडनी, लिव्हर, मधुमेह, सीबीसी, लिव्हर प्रोफाईल, लिपीड प्रोफ्राईल, रेनल प्रोफाईड, इलेक्ट्रोलाईटस्, थायरॉईड प्रोफाईल, युरिनालायसीस, सीरिॲक्टीव्ह प्रोटीन टेस्ट तसेच विविध प्रकारच्या ३३ तपासण्या केल्या जाणार आहेत. या चाचणीसाठी लागणारी सर्व यंत्रणा मुंबईहून आणली जाणार आहे. तरी यासंदर्भात अधिक माहितीसाठी ७०८३३९४४३७, ९४०४७०३०६३ येथे संपर्क साधावा. तसेच या महाआरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अपना सहयोग फाउंडेशनचे चेअरमन जरीन रुमानी, ट्रेझरर जमिला शहा व युवक कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी केले आहे.











