ओटवणे गावचे सरपंच दाजी गांवकर यांचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांसकडून सत्कार.

ओटवणे | प्रतिनीधी : ओटवणे गावचे नवनिर्वाचित सरपंच आत्माराम ऊर्फ दाजी गावकर यांची काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी ग्रामपंचायत ओटवणे येथे भेट घेवून सत्कार करत अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. उपसरपंच संतोष कासकर यांनाही शुभेच्छा दिल्या . यावेळी त्यांच्यासोबत संतोष सुकी, अभय मालवणकर, सुधिर मल्हार सह रवींद्र म्हापसेकर, सगुण गांवकर आदी उपस्थित होते.
पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत ओटवणे ग्रामपंचायत जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती कारण गाव विकास पॅनल ने दाजी गांवकर यांच्या इच्छेचा तसेच जनमताचा मान राखत आत्माराम गावकर यांना उमेदवारी दिली होती .वयाच्या ८२वर्षी सरपंच पदाची उमेदवारी दिल्याने जिल्हाभर हा चर्चेचा विषय होता . काँग्रेस चे निष्ठावंत रवींद्र म्हापसेकर यांचे नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेली होती. यात २५०पेक्षाही जास्त मताच मताधिक्य मिळवून दाजी गावकर हे थेट सरपंच पदी विराजमान झाल्यामुळे गावातली त्यांना मानणारा वर्ग तसेच त्यांचे कर्तृत्व सिद्ध झाले आहे.त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातील अनेक पक्षाचे मातब्बर नेते भेट घेत त्यांना शुभेच्छा देत आहेत.