वैभववाडी वनविभागाने बांधला वनराई बंधारा.

Google search engine
Google search engine

जंगलातील बंधारे वन्य प्राण्यांसाठी ठरतायत उपयुक्त

वैभववाडी | प्रतिनिधी : उपवनसंरक्षक सावंतवाडी व वनक्षेत्रपाल कणकवली यांचे मार्गदर्शनाखाली वैभववाडी परिमंडळातील नियतक्षेत्र करूळ येथे व. स. क्र. – 997 मध्ये वनविभागाच्या वतीने श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. वन्यप्राण्यांना पिणेसाठी पाणी उपलब्ध व्हावे व त्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत येऊं नये यासाठी त्यांना पाण्याची सोय व्हावी या हेतूने वनराई बंधारा बांधला आहे. सदर ठिकाणी परिमंडळ वनअधिकारी वैभववाडी श्री. एस. एस. वागरे, वनरक्षक करूळ श्री.उत्तम कांबळे, वनरक्षक खांबाळे अमीर काकतीकर, वनरक्षक भुईबावडा श्री. किरण पाटील, वनरक्षक त. नाका करूळ श्री.नंदू लोखंडे, श्री. समाधान वाघमोडे, वनमजूर श्री. पाताडे, श्री. कुबल, श्री. मराठे उपस्थित होते.