भैरव टाइम्स दैनिकाच्या ”दिवाळी विशेषांक”ला साहित्य पाठवा !

रत्नागिरी| (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक भैरव टाइम्स या वृत्तपत्राच्या दिवाळी विशेषांक २०२३ करिता साहित्य मागविण्यात येत आहे. यात नवसाहित्यकारांना विशेष संधी देण्यात येणार आहे. आपल्या अप्रकाशित कविता, लेख, कथा, दीर्घकथा, व्यंगचित्र, ललित साहित्य, प्रवास वर्णन, चारोळ्या… दिनांक २४ ऑक्टोबर २०२३ पर्यंत पाठवाव्यात. त्यानंतर आलेले साहित्य स्वीकारले जाणार नाही व ते परत हि पाठवले जाणार नाही. साहित्यिकांना कोणतेंही मानधन देण्यात येणार नाही. साहित्याला विषयाचे बंधन नाही. साहित्य पसंत नापसंत करण्याचे अधिकार संपादकाचे राहतील.

साहित्य हे type केलेले आणि word file किंवा PDF file स्वरूपात ई-मेल किंवा whatsapp द्वारे पाठवावे. तसेच साहित्य पोस्टाने पाठविल्यास ते typing केलेले असावे.
साहित्य पाठविण्यासाठी- ई-मेल bhairavtimes@gmail.com (विषय – दिवाळी विशेषांक साहित्य), whatsapp- 9763047787 / 9921879660, पत्ता : दैनिक भैरव टाइम्स, ३/२२८, धनश्री बंगला, पत्रकार कॉलनी, रेल्वे स्टेशन समोर, कुवारबाव, रत्नागिरी- ४१५६३९.