दापोली प्रतिनिधी: जिल्हा शासकीय रुग्णालय अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक रत्नागिरी व उपजिल्हा रुग्णालय दापोली मार्फत आंतरराष्ट्रीय युवा दिन 2025 निमित्त युवक आणि युवती यांचेमध्ये एच.आय.व्ही, एड्स विषयक जनजागृती व्हावी या उद्देशाने वय वर्ष 17 ते 25 वयोगटातील युवक व युवतींना
शनिवार दिनांक 26 जुलै 2025 रोजी सकाळी 7 वाजता ‘रेड रन मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एचआयव्ही एड्स विषयाची महाविद्यालयीन युवकांमध्ये जनजागृती करण्याकरिता या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे.
शनिवारी दिनांक 26 जुलै 2025 रोजी सकाळी 7 वाजता दापोली उपजिल्हा रुग्णालयापासुन मॅरेथॉन सुरू होणार आहे.
याकरीता मुलांकरीता पहिल्या क्रमांकाला रोख रु. 2000/- मेडल व प्रमाणपत्र, दुसऱ्या क्रमांकाला रोख रु. 1500/- मेडल व प्रमाणपत्र, तिसऱ्या क्रमांकाला रोख रु. 1000/- मेडल व प्रमाणपत्र तर चौथ्या व पाचव्या क्रमांकाला मेडल व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. मुलींकरीता देखील मुलांप्रमाणेच बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अधिक माहिती करीता पांडुरंग हुबाळे-8421402746 आणि सागर बुरटे-9146477025 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.













