Delhi Weather : दिल्लीमध्ये ऑरेंज अलर्ट; तापमानाचा पारा ४.४ अंश सेल्सिअसवर

Delhi Weather Update : नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या थंडीने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन झाले आहे. दिल्लीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. यासोबतच दिल्लीत थंडीचा पारा ४.४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. ४८ तासांत दिल्लीचा पारा ८.५ वरून ४.४ वर घसरला आहे.