गुहागर (प्रतिनिधी):तालुक्यातील तळवली भेळेवाडी येथील तरुणांच्या संकल्पनेतून साकारलेला चंद्रयान 3 देखावा सर्वांसाठी आकर्षण ठरला आहे.भेळेवाडीमधील तरुण राहुल,शुभम व दीपेश पोफळे या भावंडाच्या संकल्पनेतून हा देखावा अतिशय सुंदररित्या साकारला आहे.
यावर्षी प्रथमच भेळेवाडी मुंबई कमिटीच्या माध्यमातून वाडीअंतर्गत गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत हा चंद्रयान 3 चा देखाव्याला प्रथम पारितोषिक मिळाले. मुख्य म्हणजे ग्रामीण भागातील कौलारू घरात सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांनी आपल्या अप्रतीम कौशल्य वापरातून साकारलेला हा देखावा कौतुकास्पद ठरला आहे.












