नाटेत विदेशी गोवा बनावटीची दारू उतरवणाऱ्याला पोलीसांनी रंगेहाथ पकडले

३ लाख ५४ हजार ९२० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त

राजापूर (प्रतिनिधी): तालुक्यातील सागरी पोलीस ठाणे नाटेच्या हद्दीत सागरीका बियर शॉपीच्या बाहेरील व्हरांडयात विदेशी गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स उतरवत असतानाच नाटे पोलीसांनी राहुल धान्नाप्पा चव्हाण वय ३२ रा. तळेरे ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग याला जेरबंद केले आहे. या प्रकरणी त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी का. क. ६५ (ए), (ई), ८१,८३ गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून पोलीसांन विदेशी गोवा बनाटवटीच्या दारूसह अन्य असा सुमारे ३ लाख ५४ हजार ९२० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रविवारी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.२५ वाजता नाटे पोलीसांनी ही धडक कारवाई केली आहे. तशी माहिती पोलीसांनी दिली आहे.यातील संशयीत आरोपी राहुल धान्नाप्पा चव्हाण याने आपल्या ताब्यातील चारचाकी वाहन क्र. एम. एच. ०७, ए. जी. ८८३१ माधून विनापरवाना विदेशी गोवा बनावट दारूचे बॉक्स घेवून येऊन नाटे येथील सागरिका बिअर शॉपीच्या बाहेरील व्हरांडयात उतरवत होता. यावेळी पोलीसांनी त्याला रंगेहाथ जेरबंद केले असून त्याच्याकडे आढळून आलेल्या विदेशी गोवा बनावटीच्या दारूमध्ये १) १७,४७२/- रु.कि.चे १४ बौक्स त्यामध्ये GOLDEN A Fine WHISKY च्या १८० मिली मापाच्या ४८ बाटल्या रु.कि.चे २६ बॉक्समध्ये GOLDEN ACE Blue Fine च्या १८० मिली मापाच्या सिलबंद ४८ बाटल्या ३३,००,० सिल्वर रंगाची मारुती सझुकी अल्टो एम एच -०७ ए.जी ५,०००/- रु. कि. चा Vivo Y ७५ या कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट असा सुमारे ३ लाख ५४ हजार ९२० रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.