राजापूर (प्रतिनिधी): तालुक्यातील मोरोशी गोसावीवाडी येथे गावठी हातभट्टीची दारू गैरकायदा व विनापरवाना आढळून आल्याप्रकरणी राजापूर पोलीसांनी मोतीराम रामचंद्र गोसावी ६५ रा. मोरोशी गोसावीवाडी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तशी माहिती पोलीसांनी दिली आहे.
शनिवारी २४ सप्टेंबर रोजी १७.४५ वाजता मोरोशी गोसावीवाडी ता. राजापूर, महाराष्ट्र दारूबंदी का. क. ६५ (ई), आरोपी मोतीराम रामचंद्र गोसावी ६५ रा. मोरोशी गोसावीवाडी, यातील आरोपीत याने नमुद वर्णनाची व किंमतीची गावठी हातभट्टीची दारू गैरकायदा बिगरपरवाना आपले ताब्यात बाळगले स्थीतीत आढळून आला. सुमारे जप्त ५५० रूपये किंमतीची १० लिटर गावठी हातभट्टीची दारू गोसावी याच्याकडे आढळून आली म्हणून त्याच्या विरोधात पोलीसांनी ही कारवाई केली आहे.
——————————————————————-










