रत्नागिरीच्या राहुल कळंबटे यांची रांगोळीचा जागतिक विक्रम

रत्नागिरी | रत्नागिरीचे प्रसिद्ध रांगोळीकर राहुल कळंबटे यांच्या श्री गणरायाच्या 3d रांगोळीची दाखल इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्सने घेतली आहे. रांगोळी 3D च्या स्वरूपात काढून जागतिक विक्रम करण्याचा एक छोटासा प्रयत्न त्यांनी केला व तो विक्रम पूर्णही झाला.

राहुल कळंबटे उत्तम रांगोळीकर असून त्यांनी काढलेल्या रांगोळी राज्यभरातून वाखाणल्या गेल्या आहेत. अनेक स्पर्धामधून त्यांनी बक्षिसे मिळवली आहेत. शासकीय कार्यक्रमासह अनेक ठिकाणी त्यांना रांगोळी काढण्यासाठी खास आमंत्रित केले जाते. या विक्रमबद्दल राहुल कलंबटे यांचे कौतुक होतं आहे.